34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरलातूर लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

लातूर लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, असे राज्यातील अनेक नेत्यांना वाटते. पण, काँग्रेस पक्षाने दूरदृष्टी लाभलेले, उच्चशिक्षित आणि भूमिपुत्र असलेले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने आपल्याला दिले आहेत. या संधीचे सोने करुन लातूर लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल बाभळगाव येथे त्यांचा आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. २४ मार्च सत्कार करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष, सर्व फ्रंटल जिल्हाध्यक्ष, विधानसभानिहाय पक्षाचे सर्व निरीक्षक व इतर पदाधिकारी यांची बैठक घेवून त्यांना  आमदार धिरज देशमुख यांनी  संबोधित केले. लातूरची जागा अधिकाधिक मतांनी निवडून आणण्याचा एकत्रित संकल्प बैठकीत करण्यात आला.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, ही निवडणूक देशाला अधिक भक्कम करणारी, देशाला विकासाकडे घेवून जाणारी निवडणूक आहे. देशात इंडिया आघाडीची सत्ता आली तर लातूरच्या विकासाचे चक्र अधिक गतिमान होईल. त्यामुळे आपण सर्वांनी घरोघरी जावून काँग्रेसची ध्येयधोरणे, विचारधारा, आजवरची विकासकामे लोकांपर्यंत पोचविण्याचा निर्धार करुया. डॉ. शिवाजी काळगे यांनी आपल्या मनोगतात उमेदवारी मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे व काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. एकदिलाने व एकजुटीने लढून या निवडणुकीत जिंकण्याचा संकल्प करु, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, अशोकराव पाटील निलंगेकर, श्रीशैल उटगे, किरण जाधव, भा. ई. नगराळे, विक्रांत गोजमगुंडे, यशवंतराव पाटील, अभय साळुंके, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, रविंद्र काळे, जगदीश बावणे, अनुप शेळके,  सुभाष घोडके, अनंतराव देशमुख, प्रवीण पाटील, शिवाजी हुडे, सुनील पडिले, समद पटेल, मन्मथ कीडे, मारुती पांडे, चंद्रकांत मद्दे, अरविंद भातांब्रे, एकनाथ पाटील, रमेश सूर्यवंशी, विजय पाटील, इम्रान सय्यद, प्रवीण सूर्यवंशी,  मनोज पाटील, प्रताप पडिले, धनंजय देशमुख, लालासाहेब चव्हाण, सचिन दाताळ, गोंिवद बोराडे, सुपर्ण जगताप, दगडूसाहेब पडिले, अजित माने, अनंत बारबोले, रघुनाथ शिंदे, निलेश देशमुख, राम स्वामी, मुकेश राजमाने, दिनेश नवगिरे, नरेश
पवार, अनिल पाटील,  सदाशिव कदम, सूरेश चव्हाण, राजेसाहेब सवई, अजित काळदाते, सिराजुद्दीन जहागिरदार, गोविंद देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR