22.8 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरलातूर विभागातील लालपरी झाली भंगार

लातूर विभागातील लालपरी झाली भंगार

लातूर : प्रतिनिधी
सुरक्षीत प्रवास आणि एसटीच्या वेगवेगळ्या सवलती, लांब पल्ल्यांसाठी सुरु असलेल्या गाड्या यामुळे प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात एसटीकडे वळल्याचे चित्र आहे. असे असले तरी, लातूर विभागात खिळखिळ्या अन् भंगार बसेसवरच एसटी हाऊसफुल्ल आहे. लालपरी अशी बिरुदावली मिरविणा-या एसटी बसेस भंगार झाल्या आहेत. सध्या पावसाळा सूरु आहे. अनेक बसेस गळक्या आहेत. काही बसेसला चिकट पट्ट्या लावून गळती बंद करण्यात आली असली तरी प्रवाशांच्या अडचणी मात्र सुटता सुटत नाहीत, अशी परिस्थिती आहे.
लातूर विभागात पहाटे ५ वाजल्यापासून प्रवासी सेवा सुरु होते. ग्रामीण भागातील दैनंदिन फे-या, तसेच लांबपल्ल्यांच्या बसेसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याने चालक-वाहकांना नाकीनऊ येत आहे. एका बसची प्रवासी क्षमता ५५ असताना सध्या बहुतांशी बसमधून शंभरच्या वर प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामूळे वाहनकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने बस थांबविली नाही, तर प्रवासी वादावादीवर येत असल्याचे चालक व वाहकांची डोेकेदुखी वाढली आहे. खासगी वाहतूकीच्या स्पर्धेत एसटी उतरली असली तरी बसगाड्यांची अवस्था मात्र दयनीय आहे. त्यामुळे प्रवाशांचा भार वाहताना चालकांची दमछाक सुरु आहे.
गाड्यांची दुरवस्था झालेली असतानाही प्रवाशांची गर्दी बघता गाड्यांची देखभाल करण्यासही लातूर विभागाला वेळ मिळत नाही. एकीकडे एसटीची चाके थांबत नसल्याने दुवस्था झालेल्या बसमधून प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR