32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeलातूरलातूर शहर आज बंद; आक्रोश मोर्चा

लातूर शहर आज बंद; आक्रोश मोर्चा

लातूर : प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर निर्दयी आरोपीने ४ ते ५ दिवस अत्याचार केला आहे. त्या बाबतचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लातूर लातूर श्.ाहर बंदची हाक देण्यात आली असून आक्रोश मोर्चाही काढण्यात येणार अह.े

पीडित व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पीडित कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पीडित कुटुंबीयांस पोलिस संरक्षण देण्यात यावे, पीडित कुटुंबीयास शासनाच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत करण्यात यावी, पीडित बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, पीडित कुटुंबात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजनेअंतर्गत (विशेष बाब म्हणून) सर्वांना मदत करण्यात यावी, पीडितेच्या आईला शासकीय, निमशासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अथवा सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय शेतजमीन देण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गावबंदी करण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज रोजी सकाळी १० वाजता गंज गोलाईतील जय जगदंबा मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर प्रशासनास लहान मुलीच्या वतीने निवेदन वाचन करून, निवेदन देऊन सांगता होणार आहेतसेच लातूर शहरातील सर्व सजग व्यापा-यांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन हिंदू जन आक्रोश मोर्चा संयोजकांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR