38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरलालपरीवर अद्यापही सरकारी जाहिरातींचा भार

लालपरीवर अद्यापही सरकारी जाहिरातींचा भार

लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम दि. १६ मार्च रोजी जाहीर केला. निवडणुक कार्यक्रम जाहिर होताच आदर्श आचारसंहिता लागु होते. आचारसंहिता लागु होताच सर्व प्रकारच्या सरकारी जाहिरातींचे फलक, बॅनर, पोस्टर्स काढून घेणे आवश्यक असते. परंतू, अद्यापही लालपरी सरकारी जाहिरातींचा भार वाहत आहे. आचारसंहितेतही एस. टी. बस ‘जलजीवन मिशन’ची जाहिरात घेऊन फिरत आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होताच लातूर शहर महानगरपालिकेसह जिल्हा प्रशासनानेही सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर, झेंडे हटवल.े शनिवारी संपुर्ण दिवसभर शहरातील विविध पक्षाचे बॅनर, पोस्टर, फलक काढण्याची मोहीम राबविण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, या दृष्टीने ही मोहिम राबविण्यात आली. परंतू, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या खासदार स्वनिधीतून २०१८-१९ मध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी चौकात उभारण्यात आलेल्या बस थांब्यावरील नाव मात्र अद्यापही हटविण्यात आले नसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे.

स्वत: लातूर शहर महानगरपालिकाच आचारसंहितेंचा भंग करीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारने राज्यातील एस. टी. बसेसवर विविध सरकारी योजनांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात लावल्या. सरकारच्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एस. टी. महामंडळाचा खुप मोठ्या प्रमाणात वापर करुन घेतला. स्वच्छता अभियानपासून ते जलजीवन मिशनपर्यंतच्या सर्व जाहिराती एस. टी. बसेसवर होत्या. आदर्श आचार संहिता दि. १६ मार्च रोजी लागु होताच एस. टी. बसेसवरील जाहिराती हटविणे आवश्यक असताना अद्यापही असंख्य बसेसवर सरकारी जाहिराती पहावयास मिळतात. सरकारकडूनच एखाद्या महामंडळाच्या संपत्तीचा जाहिरातींसाठी वापर करुन आचारसंहितेचा भंग केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR