26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरलाल मिरचीचा ठसका उतरला

लाल मिरचीचा ठसका उतरला

लातूर : प्रतिनिधी
कुठल्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणा-या लाल मिरचीला यंदा अच्छे दिन आले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लातूर मार्केटमध्ये लाल मिरचीला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आहेत.
उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यंदा दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणा-या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात ५०० रुपये किलो झाले होते. मात्र, किलोमागे आता हे दर ५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा ठसका उतरणीला लागला आहे. शहरातील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्यासाठी वापरण्यात येणा-या मिरच्यांची आवक वाढली आहे. सध्या ४ ते ५ टन मिरचीची बाजारात आवक होत आहे.
 गेल्या काही दिवसापासून बाजारात लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लाल मिरची उत्पादक शेतक-यांना चांगला बाजार भावही मिळत आहे. मिरची उत्पादक शेतक-यांच्या कष्टाचे सार्थक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गतवर्षाच्या तूलनेत यंदा मिरची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे व्यापारी दिलीप स्वामी यांनी सागीतले. शहरातील बाजारातही सर्वाधिक आवक कर्नाटकातील विजापूर, इंडी, गुलबर्गा येथून होते. सध्या नव्याने हंगाम सुरू झाला असून, आवक अशीच वाढत राहिली, तर दर अजून काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे.
  मार्च व एप्रिल अखेरपर्यंत मिरचीची मागणी वाढणार असून, यंदा भाव नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रहणीचे बजेट यंदा मसाले तयार करतेवेळी कोमलडणार नाही. शहरातील बाजारात विविध प्रकारच्या लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दर ही आवाक्यात असल्याचे समोर आले आहे. बाजारात डिलक्स गुंटूर २५० ते ३०० रूपये किलो, डिलक्स तेजा २६० ते २८० रूपये किलो, संकरीत मिरची २२० ते २३० रूपये किलो, बेंडगी मिरची ४५० ते ५०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत असल्याचे व्यापारी दिलीप स्वामी यांनी एकमतशी बोलताना सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR