34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeसोलापूरलिंगायत कन्नड भवनच्या निधीसाठी पाठपुरावा करणार : खासदार गोपछडे

लिंगायत कन्नड भवनच्या निधीसाठी पाठपुरावा करणार : खासदार गोपछडे

सोलापूर- लिंगायत कन्नड भवनच्या निधीसाठी आपण सरकारदरबारी पाठपुरावा करुन लवकरात लवकर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिली. येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्यावतीने राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल डॉ. गोपछडे यांचा सत्कार कुंभार वेस येथील कार्यालयात करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. चेतना अजित गोपछडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.

लिंगायत समाजातील सर्व घटकांना एकत्र करुन समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असल्याचे गौरवोद्‌गार डॉ. गोपछडे यांनी काढले. याप्रसंगी माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, सी. ए. बिराजदार, डॉ. शिवरत्न शेटे, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, वीरशैव महासभेचे सुदीप चाकोते, प्रा. गजानन धरणे, डॉ. प्रवीण पटणे, शैलेश पाटील, सुनील रिक्के, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR