23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रलॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम खान यांना धमकी

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम खान यांना धमकी

बुरखाधारी महिलेने रस्ता अडविला

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि त्याला येणा-या धमक्या या प्रकरणांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दरदिवशी नवीन अपडेट येत असताना आज पुन्हा एकदा खान कुटुंबाला धमकी मिळाली आहे. सलीम खान आज पहाटे चालायला गेले असताना बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम यांना धमकी दिली.

सलीम खान आज वांद्रे येथे असलेल्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमधून पहाटे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्याचवेळी एका बाईकस्वाराने त्यांचा रस्ता अडवला. दोघांपैकी एकाने बुरखा घातला असून ती महिला होती. त्या महिलेने सलीम खान यांना अडवून लॉरेन्स बिश्नोईला पाठवू काय? असे विचारले. पुढे ते दोघे पळून गेले. अशाप्रकारे सलीम खान यांना अडवून पुन्हा एकदा सलमान खान आणि खान कुटुंबाला धमकी मिळाली आहे.

दरम्यान पोलिसांनी बाईकस्वार आणि बुरखाधारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेच. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलिस या दोघांचा शोध घेण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, या दोघांनी सलीम खान यांच्याशी फक्त मस्ती केली. आम्ही त्यांना अटक केली आहे. त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. याआधी ७ एप्रिलला सलमानच्या घराबाहेर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली होती. त्यानंतरही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR