22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रवंचितांना त्रास दिला तर हिशेब करणार

वंचितांना त्रास दिला तर हिशेब करणार

पंकजा मुंडे यांचा इशारा
बीड : प्रतिनिधी
तुम्हाला वाटते का माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण मी सांगते घोडा मैदान लांब नाही. धनजय मुंडे यांना परळीतून आमदार करणारच आहोत. पण राज्यातील कानाकोप-यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पीडितांना, दलितांना, गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिला.

भगवानगडाच्या पायथ्याशी सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी प्रत्येक गावागावांत आणि महाराष्ट्रातील कानाकोप-यात येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही, असे म्हणत पुढच्या लढाईचे संकेत त्यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR