29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रवसई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

वसई औद्योगिक वसाहतीत भीषण आग

नालासोपारा : वसईच्या नवघर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती.

नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेटमधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणा-या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या शैलेश इंडस्ट्रियल इस्टेटमधील गॉलॅपसिबल ट्यूब कॉर्पोरेशन या खेळणी व अ‍ॅल्युमिनियम कोलॅप्सिबल ट्यूब्स, मल्टीलेयर लॅमिनेटेड ट्यूब्स बनवणा-या कंपनीत पसरली.

या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच नजीकच्या नवघर अग्निशमन उप केंद्राच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आचोळे मुख्य अग्निशमन केंद्र व सनसिटी येथील उपकेंद्रातून पाच वॉटर टँकर व पाच फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. संध्याकाळी चार वाजता आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR