23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूर‘वसुंधरा’ गणेश मंडळाने लातूरचा लौकिक वाढविला

‘वसुंधरा’ गणेश मंडळाने लातूरचा लौकिक वाढविला

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेत लातूर येथील वसुंधरा वृक्षरुपी गणेश मंडळाला जिल्ह्यातून प्रथम तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गणेश उत्सवाचा लातूर पॅटर्न यामुळे राज्यभरात गेला. वसुंधरा गणेश मंडळाने लातूरचा लौकिक राज्यात वाढविला, असे प्रतिपादन लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी येथे बोलताना व्यक्त्त केले.

राज्यस्तरावर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वसुंधरा वृक्षरुपी गणेश मंडळ पदाधिकारी यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या सत्कार कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी शंकर साबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, संजय कलशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, लातूर पॅटर्न राज्यात आणि देशात लौकिक आहे. प्रत्येक क्षेत्रात लातूरकरांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम केले आहे. झाडाचा गणपती ही संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ही संकल्पना देशभरात लौकिक झाली. गणेश उत्सवात देखील एक आगळा वेगळा संदेश देण्याचे काम या गणेश मंडळाने केले. राज्यातून तिसरा क्रमांक आणणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु, नाविन्यता आणि कल्पकता यामुळे या गणेश मंडळाने राज्यातून तिस-या येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, उमेश मुंडलिक, रामेश्वर बावळे, अ‍ॅड. अजित चिखलीकर, अमोल स्वामी, उमेश ब्याकोडे, योगेश महाराज चांदोरीकर, अनिकेत चव्हाण, चैतन्य बनसोडे, संजय माकुडे, योगेश झिरमिरे, कृष्णा इगवे, ओंकार स्वामी, प्रिया मस्के, श्रद्धा मोरे, प्रितम जाधव, मोहिनी चांदोरीकर, स्वप्नाली जाधव, साक्षी कुलकर्णी, श्रावणी स्वामी, गौरी मामडगी, आदींसह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR