21.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रवाल्मिकी कराडवर परळीत २३ गुन्हे : अंजली दमानिया

वाल्मिकी कराडवर परळीत २३ गुन्हे : अंजली दमानिया

मुख्यमंत्र्यांकडे गुन्ह्यांची यादी देणार

बीड: प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी आहेत. वाल्मिक करडावरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत असून धनंजय मुंडे यांच्याविरोधातही भूमिका घेताना दिसत आहे. हे प्रकरण तापलेलं असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याप्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजले पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. रार्ष्ट्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याच वचन दिले.

त्यांनी या मुद्यावरून ट्विटही केले असून या विषयावर मौन सोडलं. ‘ वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीत २३ गुन्हे आहेत. त्याचे सेक्शन्स पाहिले तुम्ही तर एकेक सेक्शन त्यांच्यावर ४-५ वेळा लागले आहेत. म्हणजे इतका माहीर गुन्हेगार आहे. आणि आजपर्यंत ते फरार आहेत की त्यांना फरार केले गेले? हा सगळ्यात महत्वाचा आणु मूळ प्रश्न आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. याच्या विरुद्ध कुठल्याही परिस्थितीत जनतेने लढा दिलाच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

आता माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला देते, त्याच्यातले गुन्ह्यांची गंभीरता तुम्ही पहा. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स अ‍ॅक्टखाली ( ३/२४ आणि ४/२५ ) सीरियस गुन्हे दाखल आहेत. तरीही तो माणूस अगदी आरामात फिरतो. आणि त्याला काहीच शिक्षा होत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.

त्यांनी आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे, ते काय काय करतात हे बीडच्या कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं ना तर ते सांगतली. खंडणी वगैरे त्यातले फार चिल्लर गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे हे सर्रास करतात, असा आरोप दमानिया यांनी लावला आहे.

मु्ख्यमंत्र्यांची भेट घेऊन देणार संपूर्ण यादी
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण यादी दाखवणार आहे. असे लोकं, त्यांना ठेवणारे धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना तुम्हाला मंत्रीपद का द्यावसं वाटलं,कोणत्या बेसिसवर त्यांना मंत्रीपद दिलं ? असा सवाल विचारणार आहे. मुख्यमंर्त्यांना मी याचा जाब विचारणार असून कराड यांना शोधा आणि अटक करा अशी मागणी करणार असल्याचे
दमानिया यांनी ठासून सांगितले.

आपण जर टोटल सेक्शन किती वेळा लागलेत बघितलं, तर या लिस्ट प्रमाणे ४५ वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागले. या गुन्ह्यांमध्ये काय आहे तर कोणाला दाबून ठेवले, कोणाला जिवे मारण्याची धमकी दिली, कोणाला मारण्याचा प्रयत्न केला, इलीगल लॅमिनेशन ठेवलं म्हणजे गनचा लायसन्स गन ठेवली असे सगळे जे गंभीर सेक्शन्स आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR