21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रवाहकाने काढली मुलीची छेड

वाहकाने काढली मुलीची छेड

दापोली : राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता चक्क एसटी बस वाहकाने मुलीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एसटी वाहकाला बेदम चोप दिला. रत्नागिरीत ही घटना घडली.
मागील काही दिवसांत शालेय विद्यार्थिनींवरील अत्याचार, विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच प्रवाशांसाठी विशेषत: महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणा-या एसटी बसमध्येच वाहकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-पंचनदी बसमध्ये विद्यार्थिनीची एसटी वाहकाने छेड काढली असल्याची घटना घडली. या घटनेनंतर एसटी बसमधून प्रवास करणा-या मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. छेडछाडीची घटना समजल्यानंतर ग्रामस्थ चांगलेच संतापले.

त्यांनी या बसला घेराव घातला आणि एसटी वाहकाला बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आरोपी एसटी वाहकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR