27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरविद्यार्थ्यांनी हरित भारत निर्मितीस योगदान द्यावे

विद्यार्थ्यांनी हरित भारत निर्मितीस योगदान द्यावे

लातूर : प्रतिनिधी
वृक्ष संवर्धनातून हवामान बदल अनुकूल पर्यावरण निर्मितीस मदत होते. वातावरणातील बदलात समतोल  राखला जावू शकतो. कृषि महाविद्यालयाची एक विद्यार्थी पाच  वृक्ष हि संकल्पना सर्व विद्यार्थ्यांनी अनुसरावी व हरित भारत निर्मितीस योगदान द्यावे, असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कृषि महाविद्यालय, लातूर, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर व  एडीएम अ‍ॅग्रो डिव्हिजन  यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने देशी प्रजातीचे ५०० वृक्ष लागवड करून क्रांती वीरांचा सन्मान करण्यात आला.   या कार्यक्रमासाठी चाकूरस्थित पदव्युतर व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान, एडीएम वाणिज्य विभाग प्रमुख एम.बी.गाजरे, ख्यातनाम इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्राचार्य,डॉ. कॅप्तन भालचंद्र कराड, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी गिरी व वृक्षमित्र कालिदास लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. रोडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात असे म्हणाले कि, चलेजावच्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या क्रांतीकारकांना या वृक्षलागवडीतून सन्मानित केले आहे. वृक्ष लागवड हि क्रांती व शांती याचा सुवर्णमध्य आहे. प्रत्येक नागरिकांनी भारत मातेला प्रदूषणनातून मुक्त करण्यासाठी वृक्ष लागवड चळवळीत झोकून द्यावे.  या कार्यक्रमात देशी प्रजातीच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यात वड, पिंपळ, कडूनिंब, बकुळ, पेरू, आंबा, जांभूळ इत्यादी प्रजातींचा अंतर्भाव आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष अच्युत भरोसे यांनी केले, संचालन डॉ. व्यंकट जगताप तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्षा डॉ. ज्योती देशमुख, डॉ. राजेश शेळके, डॉ. महेंद्र दुधारे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. विनोद शिंदे, डॉ. सुनिता मगर, डॉ. प्रभाकर अडसूळ, शिवशंकर पोले, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. योगेश भगत, डॉ. विद्या हिंगे, डॉ. संघर्ष शृंगारे व श्रीमती मीना साठे यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे विद्यार्थी, पदवी व पदव्युतर विद्यार्थिनी तसेच साई पथ चलचमू लातूरचे सदस्य अशा एकूण सातशे जणांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR