24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रविधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने

विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल. आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला.

दरम्यान, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे लिफ्टने जाण्यासाठी आले असता, देवेंद्र फडणवीसही तिथे उभे होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्टसमोर गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी तळमजला ते तिस-या माळ्यापर्यंत एकत्र प्रवास केला.

दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले असता तिथे उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना ब-याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अनिल परब यांचे अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदन करत आहोत असे सांगत सर्वांच्या नजरा वळवल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR