मुंबई : येत्या दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होतील, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी नुकतीच एक सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी आगामी विधानसभेबाबत वक्तव्य केले. यासोबतच त्यांनी दिलीप लांडे यांना निवडून द्या असे आवाहनही उपस्थित जनसमुदायाला केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा आणि केलेल्या कामांचा पाढा देखील वाचला.
निवडणूक आयोग हरियाणा, जम्मू-काश्मीरसोबतच राज्यात देखील निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र, निवडणूक आयोगाने केवळ दोन राज्यांतच निवडणुका जाहीर केल्या. यामुळे राज्यात केव्हा निवडणुका होतील याची उत्सुकता राजकीय पक्षांसोबतच कार्यकर्त्यांनाही लागली. आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील असे विधान केल्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, युती आणि आघाडीकडून मतदारसंघांच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत.
सोन्याचा चमचा घेऊन आलेले लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी : मुख्यमंत्री
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत तेच राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. वंचित महिलांना १,५०० रुपयांच्या मासिक मदतीचे महत्त्व ते कधीही समजू शकत नाही. सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी फॉर्म भरले आहेत,पात्र महिलांना एनडीए सरकारने वचन दिलेले १,५०० रुपये मानधन मिळाले आहे.
—————