21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयविरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी?

विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी?

कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांचा आग्रह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे पंतप्रधानपदाचा शपथविधी घेण्याची तयारी दिल्लीत जोरात सुरू आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला. त्यामुळे संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींचीच निवड होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावे, यासाठी विनंती केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधी यांना पक्ष सदस्यांच्या भावना मान्य कराव्या लागतील, असे म्हटले तर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संसदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितले तर काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात, हे जवळपास निश्चित झाले आहे.

राहुल गांधी धाडसी नेते
राहुल गांधी धाडसी आणि साहसी नेते आहेत. ते डोळ््यात डोळे घालून बोलू शकतात. ते महत्त्वाच्या मुद्यांची माहिती ठेवतात. त्यामुळे त्यांनाच संसदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या पदाधिका-यांची मागणी आहे, असे खासदार प्रमोद तिवारी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR