22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रविरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी लढा

विरोध करण्यापेक्षा धनगर बांधवांसाठी लढा

मनोज जरांगेंचा प्रकाश शेंडगेंना सल्ला

छत्रपती संभाजीनगर : आम्हाला विरोध करण्यापेक्षा रानावनात राहणा-याधनगरांसाठी, गोरगरिबांसाठी ताकद दाखवावी. आम्हाला आरक्षण न मिळावे म्हणून मोर्चे सभा काढण्यापेक्षा इतरांसाठी धनगर बांधवासाठी लढा, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शंभूराज देसाई आले त्यांनी शब्द दिला. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. सरकारवर विश्वास ठेवावा लागेल. मागेपुढे सरकणे सुरू राहते. एक महिना त्यांना हवा होता तो दिला आहे. आता १३ जुलैपर्यंत काहीच बोलायचे नाही.

जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. हाके यांच्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकशाहीत सगळ्यांना उपोषणाचा अधिकार आहे. ते आमचे विरोधक नाहीत. आम्ही ओबीसी नेत्यांविरोधात बोलणार नाही.

मुख्यमंत्री सर्वांचेच
लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत. कारण ते फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात. ओबीसीकडे डुंकूनही पाहत नाहीत, असे म्हटले होते. यावर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री थोडं ना जातीचे असतात ते सगळ्यांचेच असतात, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR