16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरविलास सहकारी साखर कारखाना युनिट-१ चा अंतिम ऊस दर किमान ३ हजार रुपये प्रति...

विलास सहकारी साखर कारखाना युनिट-१ चा अंतिम ऊस दर किमान ३ हजार रुपये प्रति मेट्रिक टन राहणार

लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-१, वैशालीनगर, निवळी या कारखान्यामार्फत विद्यमान गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ऊसास पहिला हप्ता आणि किमान अंतिम ऊसदर देण्याबाबतचे धोरण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे विलास सहकारी साखर कारखान्याकडून पहीला हप्ता प्रति टन २७०० रुपयांप्रमाणे अदा करण्यात येत असून व अंतिम ऊस दर किमान रुपये ३ हजार रुपये प्रती मे. टन प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे माजी आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
सन २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने सुरु आहे. या गळीत हंगामात ३१ डिसेंबरअखेर १ लाख ७१ हजार ८४० मे. टन ऊसाचे गाळप केले असून दैनिक साखर उतारा १२.३६ टक्के व सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के असून १ लाख ७६ हजार ५१० क्विंटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच विद्यमान गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केलेल्या मांजरा परीवारातील निर्णयाप्रमाणे विलास साखर कारखान्याने दि. २० डिंसेबर २०२४ प्रती टन प्रमाणे ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे. विद्यमान गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसास किमान ३ हजार रुपये प्रती मे. टन प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे.
विलास कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासदांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे.  तसेच कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांनी विलास युनिट-१ कारखान्यास ऊस पुरवठा करण्याबाबतचे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच पुढील गळीत हंगामाकरिता कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणावर ऊस लागवड झालेली असून पुढील हंगामातील संपुर्ण ऊसाचे गाळपाचे सुक्ष्म नियोजन काखान्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR