लातूर : प्रतिनिधी
२३४ लातूर ग्रामीण विधासभा मतदार संघात स्विपच्या वतीने वधु वैष्णवी वर विशाल यांच्या शुभ विवाह प्रसंगी लातूर ग्रामीणच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिलदार मंजूषा भगत यांच्या प्रमूख उपस्थितीत विवाह समारंभास उपस्थित मतदारांना मतदान करण्यासाठी स्वीप समन्वयक मंगेश सुवर्णकार, अमृत स्वामी यांनी शपथ देऊन १०० टक्के मतदान करण्यासाठी आवाहन केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे यांच्या मार्गदर्शनाखाली २३४ लातूर ग्रामीण विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्विपच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत दिपज्योती नगर येथे संगमेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या शिंदे व रकटाटे परिवाराच्या विवाह समारंभ प्रसंगी व ग्यानदेव मंगल कार्यालयातील शिलेदार परिवाराच्या आशिष व रोहिनी यांच्या विवाह प्रसंगी रेणापूर तालुक्याच्या तहसिलदार तथा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजूषा भगत व स्विप टिमच्या उपस्थितीत मतदार जागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी डॉ. मारुती सलगर, स्वीप समन्वयक मंगेश सुवर्णकार, धनराज गिते, विजय माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अमृत स्वामी, हनमंत भाशिंगे, महादेव बन, सुरेखा चंदेले यांची उपस्थिती होती. अमृत स्वामी यांनी मतदारांना मतदानाची प्रतिज्ञा दिली व मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी २० नोव्हेंबरला मी मतदान करणारच असे स्टीकर हातात घेऊन मतदान करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक मतदार या प्रसंगी उपस्थित होते.