30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रविहिरीत बुडून दोन भावांचा मृत्यू

विहिरीत बुडून दोन भावांचा मृत्यू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन सख्ख्या भावांचा विहिरीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातल्या राजापूर शिवारात ही घटना घडली. आईसोबत शेतामध्ये गेले असता हा प्रकार घडला. विहिरीमध्ये जास्तप्रमाणात गाळ असल्यामुळे त्यामध्ये अडकून या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे राजापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठणच्या आडूळ बुद्रुक येथील कृष्णा विठ्ठल फणसे यांची राजापूर शिवारात शेती आहे. या शेतावर कृष्णा यांच्या पत्नी वर्षा मंगळवारी सकाळी आपली दोन मुलं प्रणव (६ वर्षे) आणि जय (९ वर्षे) यांना घेऊन गेल्या होत्या. वर्षा फणसे या शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे जमा करत होत्या. तर त्यांची दोन्ही मुलं बाजुला खेळत होते. अशातच ही दोन्ही मुलं आईची नजर चुकवून विहिरीच्या दिशेने गेले.

विहिरीजवळ दोघेजण खेळत होते. त्याचवेळी कठडे नसलेल्या या विहिरीमध्ये तोल जाऊन जय आणि प्रणव पडले. विहिरीमध्ये पाणी आणि गाळ देखील जास्त होता. विहिरित काही तरी पडल्याचा आवाज आल्यामुळे वर्षा यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. पण तो पर्यंत उशिर झाला होता. त्यांनी आरडा ओरडा करून आजूबाजूच्या शेतातील नारिकांना बोलावले. या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. विहिरीमध्ये बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

पाचोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रणव व जयचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR