23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeसोलापूरवीज महामंडळाचा गलथानपणा, गुळवंची येथील शेतक-याच्या २४ म्हशी मृत्यूमुखी

वीज महामंडळाचा गलथानपणा, गुळवंची येथील शेतक-याच्या २४ म्हशी मृत्यूमुखी

उत्तर सोलापूर- तालुकाप्रतिनिधी
उत्तर सोलापूर गुळवंची येथील बंधा-यांमध्ये वीज महामंडळाची तार तुटून बंधा-यात पडली असताना देखील वीज पुरवठा खंडित झाला नाही. तार तुटली असताना देखील त्या तारेवरील विद्युत खंडित न होता तसाच वीज पुरवठा चालू राहिल्याने पाण्यामध्ये वीज उतरली. त्यामुळे गुळवंची येथील विष्णू हरिदास भजनावळे यांच्या पंढरपुरी जातीच्या २४ म्हशी मृत पावल्या आहेत.

सदर घटना गुरुवार ४ जुलै रोजी सायंकाळी पाच – साडेपाच दरम्यान घडली. सदर शेतक-याचे जवळजवळ ४०-४५ लाखाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भजनावळे कुटुंबावर अचानक ओढवलेल्या संकटामुळे सदर शेतकरी व भजनावळे कुटुंब मानसिकतेने खचलेले आहे. सदर शेतक-याला न्याय व आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR