19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रवेणा नदीत सापडले ८०० आधार कार्ड

वेणा नदीत सापडले ८०० आधार कार्ड

नागपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वेणा नदीकिनारी तब्बल ८०० आधार कार्ड आढळून आले आहेत. पोलिसांनी हे आधारकार्ड जप्त केले असून या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेणा नदीत शिवारात ८०० आधार कार्ड अज्ञाताने फेकले होते. दोन दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांना नदीपात्रात अनेक आधार कार्ड दिसून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर पोलिसांनी परिसरातून फेकलेले सुमारे ८०० आधार कार्ड जप्त केले आहेत. प्राथमिक तपासानुसार हे आधारकार्ड वानाडोंगरी पोस्ट ऑफिसमधून वितरित न केलेले आधारकार्ड असल्याची शक्यता आहे. वानाडोंगरी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या वर्षभरापासून वितरित न केलेले आधार कार्ड मोठ्या प्रमाणात पडून होते. तेच आधार कार्ड कुठल्यातरी कर्मचा-याने वितरित न करता नदीपात्रात फेकून दिले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR