22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रवैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार

वैद्यकीय महाविद्यालयात जेनेरिक औषधे मिळणार

मुंबई : गेल्या काही वर्षात ब्रँडेड औषधाच्या तुलनेत जेनेरिक औषधे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधाच्या तुलनेने अधिक स्वस्त असतात त्यामुळे गरीब रुग्णांना परवडतात. विशेष म्हणजे या औषधाची गुणवत्ता सुद्धा चांगल्या प्रकारची असल्यामुळे केंद्र सरकार जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणत प्रसार करत आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांश सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकाने सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. यासाठी त्यांच्या मार्फत तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात औषधनिर्माण शास्त्रात मोठी प्रगती झाली आहे. तसेच अनेक रुग्णांना काही औषधे ही आयुष्यभरासाठी घ्यावी लागतात. त्यामध्ये विशेष करून रक्तदाब, मधुमेह, हृद्यविकार तत्सम आजरांचा समावेश असतो. त्यासोबत थंडी, खोकला, ताप या नियमित आजरांसाठी रुग्ण नियमितपणे बाजारातून औषधे घेत असतात. अनेक रुग्णांना यासाठी मोठा खर्च होतो. सध्याच्या घडीला बहुतांश आजारावरील जेनेरिक औषधे आता बाजरात उपलब्ध झाली आहेत. विशेष म्हणजे ही औषधे ब्रँडेड औषधाच्या तुलनेत अधिक स्वस्त असतात.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांचा समज असतो कि जेनेरिक औषधे ही उपचारासाठी जास्त प्रभावी नसतात. मात्र तो समज पूर्णपणे चुकीचा आहे. ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमध्ये समान औषधी घटक असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारची औषधे ही प्रभावीच असतात. त्यामुळेच शासनाने रुग्णांना जेनेरिक औषधे सहज पणे उपब्लध व्हावीत याकरिता या औषधे विक्रीकरिता वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयात विक्रीसाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी नॅकोफ इंडिया लिमिटेड, एच एल एल लाईफ केअर लिमिटेड, एच एस सी सी लिमिटेड या संस्थांना हे काम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. या संस्थांपैकी एक कंपनीलाकिंवा विभागून देण्यास मान्य देण्यात आली आहे. या संस्थामार्फत जेनेरिक औषधी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी २०० ते २५० चौरस फूट इतकी जागा प्रथमत: १० वर्षासाठी भाडे तत्वावर उपलब्ध करण्यात येईल. त्यानंतर सदर संस्थेच्या सेवा समाधान कारक असल्यास पुढील पाच वर्ष सदर संस्थेस भाडेतत्वावर देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR