28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्र‘शक्तिपीठ’साठी सरकारचा अट्टाहास का?

‘शक्तिपीठ’साठी सरकारचा अट्टाहास का?

मुंबई : प्रतिनिधी
समृद्धी महामार्ग बांधला किती उत्पन्न आहे? आमचे सगळ्यांचे म्हणणे आहे की शेतक-यांचा विरोध असताना हा महामार्ग करू नका, हजारो शेतक-यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. तरी सरकारचा अट्टाहास का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, राज्यात ‘शक्तिपीठ’ महामार्गाला विरोध करत शेतक-यांनी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ज्या मार्गाची गरज नाही त्याचा अट्टाहास का करायचा? समृद्धी मार्गाने गेले की बायको घरी वाट बघते, नवरा घरी येईल की नाही? एवढा बोगस रस्ता बनवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

हे डबल ढोलकी सरकार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले शक्तिपीठ महामार्ग होणार नाही. निवडणूक झाल्यावर भूमिका बदलली. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री संयुक्त जबाबदारी आहे. आज बहुमत आहे म्हणून सुरू आहे, उद्या जनता जागा दाखवेल असेही वडेट्टीवार म्हणाले. शेतक-यांची फसवणूक केली आहे. शेतक-यांना कर्जमाफी देणार सांगितले आणि मतं मागितली. आता मात्र कर्जमाफी करत नाहीत. शेतक-यांनी ज्या मातीत घाम गाळला आहे, त्याच मातीत शेतकरी त्यांना गाडतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

तिघांची तोडं तीन दिशेला आहेत. खाताना मात्र एक येतात असे वडेट्टीवार म्हणाले. एक म्हणतो होणार नाही दुसरा म्हणतो झाल्याशिवाय राहणार नाही. हे डबल ढोलकी सरकार आहे. समृद्धी मार्गाने गेले की बायको घरी वाट बघते. नवरा घरी येईल की नाही, एवढा बोगस रस्ता बनवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले. टक्केवारीचे हे सरकार आहे. शेती आणि माती आमची आई आहे. आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री कोल्हापुरात गेले आणि म्हणाले की, महामार्ग करणार तर एकनाथ शिंदे नाही म्हणतात. त्यांचं कोणी ऐकत नाही हा खरा प्रश्न आहे असे वडेट्टीवार म्हणाले. शेतक-यांचे भले होईल असे वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.

एका वर्षात २७०० शेतक-यांच्या आत्महत्या
सरकारच्या धोरणामुळे एका वर्षात २७०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. विरोधक म्हणून तुमच्या आम्ही पाठिशी आहोत. आमचा निर्धार पक्का आहे. ज्या मार्गाची गरज नाही याचा अट्टाहास का करायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या लढ्यात १०० टक्के तुमच्या सोबत आहोत. ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR