18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालणार

शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालणार

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यासोबत असतानाही शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा अबाधित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे आणि दोन्ही पवार एकत्र यावेत अशी इच्छाही व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार असल्याचे मोठे विधान आ. नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावरील निष्ठा काही कमी झालेली नाही. शरद पवार यांच्याबद्दलचा आदर ते वेळोवेळी बोलून दाखवत असतात. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे सांगतानाच आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी मीडियाशी संवाद साधताना केले आहे.

पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले पाहिजे, असे साकडे पांडुरंगाला घातले आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ बोलत होते. माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोधक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजेत.

साहेबांसमोर लोटांगण घालणार
दोन्ही पवार एकत्र आले पाहिजेत ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पांडुरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR