25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeशरद पवार यांच्या गौप्यस्फोटात राजकारणातील बदलाचे संकेत

शरद पवार यांच्या गौप्यस्फोटात राजकारणातील बदलाचे संकेत

मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ श्ािंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का? या प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांनी दिले. त्यावेळी एकनाथ श्ािंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे २००४ मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असा दावा शरद पवारांनी केला. शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटातून महाराष्ट्रातील राजकारणात भविष्यात काही बदल होऊ शकतात याचे संकेत मिळतात.

शरद पवार यांचे महत्त्वाचे गौप्यस्फोट
१) विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर एकनाथ श्ािंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचे नाव आमच्यापुढे आले नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचे नंतर समजले.
२) २०१४ मध्येच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेली आणि २०१४ मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला.
३) प्रफुल्ल पटेल २००४ पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिले. २००४ च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखे सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासन्तास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितले. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं, असंही शरद पवार म्हणाले.
४) २००४ मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती.
५) काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.
या सा-या बाबींचा मतितार्थ असा की, येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकारण नवे वळण घेण्याच्या तयारीत आहे. मात्र ती नेमकी वेळ येण्याची आस सा-यांनाच लागून राहिलेली आहे, असे यातून जाणवते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR