31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeलातूरशहरातील ३६१ पैकी २११ होर्डिंग अनधिकृत

शहरातील ३६१ पैकी २११ होर्डिंग अनधिकृत

लातूर : प्रतिनिधी
घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर शहर महानगरपालिकेने दि. १५ मे रोजी शहरातील मोठे होर्डिंग काढण्याची कारवाई सुरु केली. पहिल्या दिवशी सहा होर्डिंग काढण्यात आले. ही मोहीम दुस-याही दिवशी राबविण्यात आली. दिवसभरात चार भले मोठे होर्डिंग कट करुन काढण्यात आले. दरम्यान  शहरातील ३६१ होर्डिंगपैकी तब्बल २११ होर्डिंग अनधिकृत असून हे सर्वच होर्डिंग काढण्यात येणार आहेत.
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या सूचनेनूसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कालपासून शहरातील होर्डिंगस् काढण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. अधिकृत, अनधिकृत, खाजगी इमारतींवरील सर्वच होर्डिंग काढून घेण्यात येणार आहेत.  शहरात मोठ्या आकाराचे ३६१ होर्डिंगस् आहेत. त्यापैकी तब्बल २११ होर्डिगस् अनधिकृत आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत शहर होर्डिगमुक्त होणार आहे. त्यानंतर ज्या एजन्सी होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करतील त्याच एजन्सींना महानगरपालिका  परवानगी देणार आहे. संबंधीत एजन्सींनी परवान्यातील नियम, अटी, शर्तीचे पालन करुनच  होर्डिंग उभे करावयाचे आहे. होर्डिंगचा आकार परवान्यात नमुद असेल, त्या आकाराचेच होर्डिंग असले पाहिजे.
शहरात ३६१ अनधिकृत होर्डिंग ओहत. स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही की, स्टॅबिलिटी प्रमाणपत्र नाही. जाहिरात एजन्सींनी महानगरपालिकेच्या अधिका-यांना हाताशी धरुन शहरातील मोक्याच्या जागांवर ब्निाधास्तपणे होर्डिंग लावले आहेत. विशेष म्हणजे शहराच्या अगदी दर्शनीभागात होर्डिंग  लावले. ते महानगरपालिकेच्या नजरेतून कसे सूटले. त्याचा महसूल गेला कुठे? अनेकांनी अधिकृत शुल्क भरलेले नाही, याकडे  मनपाचे दुर्लक्ष कसे झाले? खरे तर ३६१ पैकी २११ होर्डिंग अनधिकृत असतील तर या अनधिकृत  होर्डिंगला अभय होणाचे आहे?,  हा खरा प्रश्न असून या बाबीची सखोल चौकशी होणे अपेक्षीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR