लातूर : प्रतिनिधी
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संयुक्त्त सेवा परीक्षा-२०२२ चा निकाल जाहिर करण्यात आला. या निकालामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाची विद्यार्थीनी अनिषा दयानंद आगरकर ही विद्यार्थीनी मुलींमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आली आहे.
येथील राजर्षी शाहूमहाविद्यालयाच्या बी. ए. स्पर्धा परीक्षा विभागामध्ये शिक्षण पूर्ण केलेली विद्यार्थीनी अनिषा दयानंद आगरकर या विद्यार्थीनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र संयुक्त्त सेवा परीक्षा-२०२२ ही परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये अनिषा आगरकर हिने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यांमध्ये परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र संयुक्त्त सेवा परीक्षा-२०२२ पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहिर करण्यात आला. या निकालामध्ये अनिषा आगरकर हि मुलींमध्ये महाराष्ट्रातून प्रथम आली आहे.
अनिषा आगरकर हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र संयुक्त सेवा परीक्षा-२०२२ च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलींमध्ये प्रथम आल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. अभिजीत यादव, प्रा. माधव शेळके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.