19.3 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार?

शिंदे गट, अजित पवारांचा सुपडा साफ होणार?

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेबाबत रोहित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुतीतही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा खुलासा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार असून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ १०० च्या आसपास जागा मिळणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत भाजपचा अंतर्गत सर्व्हे फोडला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR