19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयशिंदे यांच्या पाठोपाठ नितीशकुमार मुख्यमंत्रीपद गमावण्याची चिन्हे

शिंदे यांच्या पाठोपाठ नितीशकुमार मुख्यमंत्रीपद गमावण्याची चिन्हे

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, भाजपने मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांना तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. दरम्यान, आता बिहारच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी भाष्य केलं आहे.

२०२५ मध्ये होणा-या बिहार विधानसभेची निवडणूक एनडीए कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवणार, नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएचा चेहरा असतील का? या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पवित्र्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे उदाहरण देत पत्रकारांनी बिहारच्या राजकारणाबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला. यावेळी शाह म्हणाले, बघा तुम्ही काहीही बोला, पण आता एनडीएमध्ये फूट पडणार नाही. काळजी करू नका. यावेळी मुलाखतीत २०२५ ची विधानसभा निवडणूक नितीश कुमार चेहरा म्हणून लढणार का? यावर अमित शहा म्हणाले, पक्षाचे धोरणात्मक निर्णय या प्रकारच्या टीव्ही कार्यक्रमात घेतले जात नाहीत. असे निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या संसदीय मंडळाकडे तसेच नितीश कुमार यांच्या पक्षालाही आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या या उत्तरानंतर आता बिहारच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. २०१९ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेहमीच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असे म्हणत होते. आता येणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेमकी कोणती खेळी करणार याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR