22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात दमदार पाऊस

शिरूर अनंतपाळ तालुक्यात दमदार पाऊस

शिरुर अनंतपाळ :  शकील देशमुख 
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर जुनच्या दुस-या आठवड्यात सोमवारी सायंकाळी शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने ओढे- नाले ओसंडून वाहू लागले. शेत शिवार जलमय झाल्याने शेतक-याांतून समाधान व्यक्त केले जात असून या पावसाने खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात एक ही पाऊस पडला नसल्याने पेरण्या लांबल्या व नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागत होते. अखेर वातावरणात बदल होवून शनिवारी सायंकाळी व त्यानंतर सोमवारी दुपारी वरुणराजाने दमदार एंट्री केल्याने शेतक-यांच्या चेह-यावर हसु फुलले असून यात नागरिकांना देखील उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
   दरम्यान शेतकरी बांधवांनी जुन महिन्यापुर्वीच खरीप हंगाम पेरणीपुर्व मशागतीची कामे पुर्ण करून खरीप पेरणीसाठी आवश्यक पावसाची वाट पाहत होते.मात्र जुन चा पहिला आठवडा कोरडा गेल्याने पेरणी उशीरा होणार होऊन उत्पादनावर फरक पडणार या भितीने शेतकरीचिंतीत झाले होते. मात्र शनिवारी सायंकाळी तालुका ओलांिचब झाला होता.त्यात सोमवारी सकाळपासूनच उष्णतामान वाढले होते पण अचानक दुपारी ५ वाजता वादळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली.या दमदार पावसाने उजेड लगतच्या ओढ्याला पुर आला तर छोटे मोठे नाले – ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR