परभणी : शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजने अंतर्गत येणा-या समस्या व अडचणी दूर होण्यासाठी दि.१९ सप्टेंबर रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते शेतकरी मदत व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या मदत केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून राबविल्या जाणा-या महाडीबिटी, पी.एम. किसान, सोलर पंप, पीक कर्ज, पशू संवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सिंचन विहीर, फळबाग लागवड, कृषी विभागाशी निगडित सर्व योजना, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, आण्णासाहेब पाटील, ओबीसी महामंडळ योजना आदी योजने संदर्भात मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी आ. डॉ. राहुल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद देशमुख, रवींद्र पतंगे, सोपान अवचार, संजय गाडगे, शिवाजी चोपडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश समिंद्रे, किरण समिंद्रे, किरण डुकरे, रमेश चोपडे, कार्यक्रमाचे आयोजक संतोष चोपडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांच्या हस्ते शेतक-यांना नॅनो डी. ए. पी. व नॅनो युरियाचे वाटप करण्यात आले.