22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांच्या रोषामुळे बदलले मोदींच्या सभेचे ठिकाण

शेतक-यांच्या रोषामुळे बदलले मोदींच्या सभेचे ठिकाण

दिंडोरी : शेतक-यांच्या रोषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचार सभेचे ठिकाण बदलावे लागले असा दावा आमदार रोहित पवार यांनी आज केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सभा झाली. या सभेनंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींना टोला लगावला.

भाजपने दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. केंद्र सरकारने शेतक-यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे देशात अनेक आंदोलने झाली. कांदा निर्यात बंदीसारख्या निर्णयामुळे शेतक-यांच्या मनात मोदी सरकारबाबत रोष निर्माण झाला आहे. या रोषाला भाजप तोंड देऊ शकत नाही, यामुळे त्यांनी सभेचे ठिकाण बदलले असे रोहित पवार म्हणाले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ, दिलीप बनकर, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि सुहास कांदे हे पाच आमदार अजित पवार आणि शिंदे गटाचे आहेत. तर भाजपचा एक आमदार आहे. यामुळे भारती पवार यांना दिंडोरीतून सहज विजय मिळेल असे भाजपला वाटत असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे भारती पवार यांना तगडे आव्हान देत आहेत, यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR