22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeसोलापूरशौचालयाजवळ बसून जेऊरकरांचा रेल्वेने प्रवास ; क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

शौचालयाजवळ बसून जेऊरकरांचा रेल्वेने प्रवास ; क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

सोलापूर :रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हैदरावाद मुंबई एक्स्प्रेसने दररोज २०० ते ३०० प्रवासी जेऊर स्थानकावरून पुणे, मुंबई, दौंड, उरळी, केडगाव, लोणावळा, गुण कर्जत याठिकाणी ये-जा करतात. हने क्षमतेपेक्षा किती तरी अधिक प्रवाशांची गर्दी होत असल्याने पुणे, मुंबईकडे गुण जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील स्थिती ना. फारच वाईट आहे. नाईलाजास्तव बल प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास नम करत आहेत.

या संबंधीचा एक व्हिडीओ बुधवारी (दि. २२) सोशल बरा मीडियावर व्हायरल झाला. गाड्याला स्लीपर व जनरल डबे वाढविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. वातानुकूलित डब्यांची संख्या वाढविताना बहुतांश रेल्वेगाड्यांमधील , जनरल डब्यांची संख्या कमी झाल्याने गोरगरीब प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली नार आहे. जनरल व्यतिरिक्त दुसऱ्या क्लासचा प्रवास परवडत नसल्याने प्रवासी गावाला जाण्यासाठी रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल डब्यात स्वतःलाकोंबून घेत प्रवास करतात.

क्षमतेपेक्षा किती तरी अधिक प्रवासी डब्यात शिरत असल्याने बसणे तर सोडा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. खास करून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अवस्था फारच वाईट आहे. प्रवासी चक शौचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवासी करीत आहेत. यातीलच काही प्रवासी पर्यायच नसल्याने वातानुकूलित डब्यात शिरतात अन् नंतर आरक्षित आसनावर जबरदस्तीने बसून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत त्यांचा वाद होतो. बुधवारी सकाळी हैद्राबाद- मुंबई एक्स्प्रेस जेऊर स्थानकावर आली. ती येथून सुटली तेव्हा खाली उतरून परत जिवाची बाजी लावून अनेक प्रवासी धावत्या गाडीत प्रवास करत होते.

हा व्हिडीओ बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे, गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी टीसी आणि रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची असते. आरक्षणाशिवाय त्या डब्यात प्रवाशांना शिरूच दिले जाऊ नये, ही त्यांची जबाबदारी असते. मात्र, ही मंडळी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.व्हायरल व्हिडीओतून प्रवाशाच्या जिवाला कसा धोका आहे, त्याची कल्पना येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, येथील प्रवासी संघटनेच्यावतीने रेल्वे प्रशासनाने स्लीपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR