21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरश्रमिकांना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे

श्रमिकांना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे

रेणापूर : प्रतिनिधी
आपल्या  देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली परंतु स्वतंत्र भारतातील श्रम करणारा वर्ग आजही अनेक आव्हानांना तोंड देत आनंदी जीवनाच्या आकांक्षा बाळगून आहे.  स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर श्रमिकांच्या प्रश्नावर अनेक साहित्यकांनी आपल्या साहित्यातून श्रमिकांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि त्यांचे अस्तीत्व टिकवण्यासाठी सतत धडपड करीत असतात असे प्रतिपादन ख्यातनाम ंिहंदी लेखक भगवानदास मोरवाल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ंिहदी साहित्य अकादमी मुंबई व येथील  शिवाजी महाविद्यालय ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि २० ऑगस्ट  रोजी ंिहंदी साहित्य मे श्रमिक वर्ग या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर या होत्या तर उद्घाटक म्हणून साहित्यकार डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ भारती गोरे, प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी, उपप्राचार्य डॉ. रमाकांत घाडगे, प्रा .डॉ प्रकाश शिंदे. प्रा .डॉ . गणेश नागरगोजे ,समन्वयक प्रा. डॉ. सतीश यादव, सहाय्यक समन्वयक प्रा. डॉ. अर्जुन कसबे यांची  उपस्थिती
होती.
डॉ रणसुभे यांनी श्रमिक  वर्गाला  प्रामाणिकपणे काम करूनही त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळत नाही. स्वतंत्र भारतातील श्रमिक वर्गाच्या स्थितीचा गांभीर्याने विचार करून श्रमिक वर्गाला प्रतष्ठिा मिळवुन देण्याची जबाबदारी ही सर्वाची आहे असे सांगितले. अध्यक्षीय समारोप संस्थेच्या सचिव कव्हेकर यांनी  केले.  यावेळी प्राचार्य डॉ.अवस्थी व प्रा डॉ यादव यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ पल्लवी पाटील  यांनी तर आभार प्रा डॉ अर्जुन कसबे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR