15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरश्रीराम प्रतिष्ठापनानिमित्त भक्तीमय वातावरण

श्रीराम प्रतिष्ठापनानिमित्त भक्तीमय वातावरण

निलंगा : प्रतिनिधी
अयोध्या येथे रामलला जन्मभूमीच्या मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त निलंगा शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आठ दिवस राम कथाचे आयोजन करून सोमवारी दि २२ जानेवारी रोजी महादेव मंदिर व राम मंदिर परिसरात या राम कथेचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, अरंिवंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजीनगर येथील राम ललाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ,छत्रपती संभाजी महाराज चौक, आनंदी चौक, दापकावेस ते राम मंदिर व निळकंठेश्वर मंदिर येथे येऊन समारोप करण्यात आला. या मिरवणुकीरथात विराजमान झालेले राम सीता लक्ष्मण व हनुमान यांचा जिवंत देखावा, राम लल्लाची पालखी, महिला भजनी मंडळ, महिला कलश यात्रा, लेझीम पथक, झांज पथक, घोड्यावर विराजमान झालेले लवकुश, नाशिक ढोल, धनगरी ढोल, छत्रचामर, भगवे ध्वज,अशा अनेक विविध कार्यक्रमाने या निवडणुकीत राम भक्तांनी सहभाग नोंदवला. सिया प्रभू रामचंद्र की जय, श्रीराम जय राम जय जय राम अशी घोषणाबाजी करत या मिरवणुकीत आबाल वृद्धाश्रह महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती  लावली.  या मिरवणुकीनंतर निळकंठेश्वर मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर सकाळी राम कथेचा समारोप करून महा आरती करण्यात आली. अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होतानाचे लाईव्ह प्रक्षेपण राम कथा मंडपात दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरंिवंद पाटील निलंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंंगाडे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, किशोर लंगोटे, माऊली बरमदे, संतोष बरमदे, माजी चेअरमन दगडू सोळुंके, नयन माने, मनोज कोळ्ळे, ंिपटू पाटील, शेषराव ममाळे, प्रमोद अग्रवाल, रवी अग्रवाल, अनिल अग्रवाल, गणेश कुलकर्णी, जयराम वाघ, किशोर दुधणकर रवी फुलारी, अँड. वीरभद्र स्वामी, लालासाहेब देशमुख, शितल राठी, रामबिलास धूत, ओम बाहेती, भगवान बाहेती संतोष लांबोटकर, पांडुरंग तोष्णीवाल, राजू बाहेती, सुमित जाजू, रवी फुलारी, सुमीत ईनानी, शंकर भुरके शितल राठी यांच्यासह राम भक्तांनी परिश्रम घेतले.  या निमित्ताने निलंगा शहरातील सर्वच मंदिरात रोषणाई करण्यात आली होती तर व्यापा-यांने आपल्या दुकानावर भगवे ध्वज लावून रोषणाई केली होती. महिला भगिनींनी घरासमोर सडा रांगोळ्या घालून या मिरवणुकीचे उत्साहात स्वागत केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR