23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरश्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावीच्या परीक्षेत यश

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावीच्या परीक्षेत यश

लातूर : प्रतिनिधी
जाहीर झालेल्या मार्च २०२४ च्या दहावीच्या परीक्षेतील निकालासह सीबीएसईच्या निकालामध्ये श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांनी बाजी मारली आहे.  संस्थेच्या, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल आणि श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल १०० लागला असून राजा नारायणलाल लाहोटी स्कूलचे २९ तर बंकटलाल लाहोटी स्कुलचे २८ विद्यार्थी ९० टक्केच्या पुढे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. भावना गोजमगुंडे ९८ आणि काबरा अथर्व, अग्रवाल तन्मय ९७ टक्के घेऊन हे विद्यार्थी शाळेतून प्रथम आले आहेत.
राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाचा निकाल ९५.५८ टक्के लागला असून  ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे ३१ विद्यार्थी आहेत. बेताळे शुभदा आणि वाकडे साक्षी या दोन विद्यार्थीनी ९८.६० टक्के गुण घेवून पहिल्या आल्या आहेत. श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचा निकाल ९९.०६ टक्के लागला असून या विद्यालयाच्या ४० विद्यार्थिनी ९० टक्केच्या  पुढे गुण घेणा-या ठरल्या. गायत्री रणदिवे ही विद्यार्थिनी १०० टक्के गुण घेवून प्रथम आली आहे.
संस्थेच्या सर्व शाळांनी दहावीच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून तब्बल १२८ विद्यार्थी ९० टक्केच्या पुढे गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे लक्ष्मीरमण लाहोटी, शैलेश लाहोटी, आशिष बाजपाई, राजेंद्रकुमार मालपाणी, दिनेश इन्नाणी, शरदकुमार नावंदर, ईश्वर डागा, लक्ष्मीकांत कर्वा, आनंद लाहोटी, डॉ. अनिल राठी, कुमुदिनी भार्गव सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य  यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR