परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या ड-झोन खो-खो स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. महाविद्यालयाच्या संघाने सहभागी सर्व संघावर एकतर्फी विजयी मिळवत प्रथम विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी अनेकदा महाविद्यालयाने प्रथम येण्याचा विक्रम केला आहे.
सदरील स्पर्धेत हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील बहुसंख्येने संघ सहभागी झाले होते. या विजयी संघात कर्णधार अंजली शिंदे, भाग्यश्री कोरडे, गायत्री वाघ, अश्विनी लोंढे, अश्विनी आठवले, वैष्णवी सुरवसे, वैशाली असेवार, पल्लवी पितळे ,निकिता मस्के, जयश्री जयस्वाल, मधुरा, वैशाली घोडके, शितल पतंगे, रूपाली शिंदे, दिव्या रेवनवर या खेळाडूंचा समावेश होता. संघास क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संतोष कोकिळ, प्रा. राजेसाहेब रेंगे, डॉ. संतोष सावंत, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांचे मार्गदर्शन लागले.
खेळाडूंच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळुंके, आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. उत्कर्ष किट्टेकर, प्रबंधक विजय मोरे, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचा-यांनी अभिनंदन केले.