22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरसंगीतकार मोहरीर यांना स्व. विलासराव देशमुख स्मृती संगीत कलारत्न पुरस्कार जाहीर

संगीतकार मोहरीर यांना स्व. विलासराव देशमुख स्मृती संगीत कलारत्न पुरस्कार जाहीर

लातूर : प्रतिनिधी

येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व सरस्वती संगीत कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या संगीत कलावंतास संगीत रसिकराज स्व. विलासरावजी देशमुख स्मृती ‘संगीत कलारत्न’ पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी भारतीय अभिजात व सिनेशास्त्रीय संगीत क्षेत्रात लक्षणीय काम करणा-या युवा संगीतकार निलेश मोहरीर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या पुरस्काराच्या त्रिसदस्यीय निवड समितीने एकमताने संगीतकार निलेश मोहरीर यांची निवड केली आहे. मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सिनेगीते असोत वा सिनेशास्त्रीय गीते अथवा मालिकांचे शीर्षक गीते,अनेक मराठी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या सर्वांना अतिशय दर्जेदार संगीत देऊन त्यांना लोकप्रिय करण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष संगीतकार निलेश मोहरीर हे करत आहेत. त्यांनी संगीतबध्द केलेले चित्रपट हे श्रोत्यांच्या हृदयात आहेत. ‘ संगीत कलारत्न ‘ पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ हे या पुरस्काराचे स्वरूप असून थोड्याच अवधीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. असे मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ.राम बोरगावकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR