32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रसंतप्त महिलांनी केली साड्यांची होळी

संतप्त महिलांनी केली साड्यांची होळी

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना साडी वाटप केले होते. मात्र आता या साड्यांची महिलांनी होळी केली आहे. याचा एक व्हीडीओही समोर आला आहे.

दरम्यान, यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहेत. या व्हीडीओत काही महिला या रस्त्यावर साड्यांची होळी करताना दिसत आहेत.

या सर्व महिला सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावातील आहेत. या साड्यांचे वाटप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते. मात्र मराठा समाजातील महिला आणि गावक-यांनी मिळून या साड्यांची होळी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR