25.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजीनगरात २ गटांत राडा, ४ जण जखमी

संभाजीनगरात २ गटांत राडा, ४ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीचा धक्का लागल्याने संभाजीनगरात शनिवारी मध्यरात्री दोन गटांत जोरदार राडा झाला.

येथील राजा बाजार परिसरातील किराणा चावडी भागात एका गटाने दुचाकीचा धक्का लागल्याने २ दुचाकींवरून जाणा-या चारजणांना बेदम मारहाण केली. यात चौघेही जखमी झाले. तर स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनीही मारहाण करणा-यांवर हल्ला केला. त्यात काही जण जखमी झाले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच दोन्ही गटांतील मोठ्या संख्यंने लोक किराणा चावडी परिसरात जमले होते. यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी या भागात पोलिस बंदोबस्त वाढवत जमावाला पांगवले आणि पहाटेपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR