15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूरसकल मुस्लिम समाजाचा जनआक्रोश

सकल मुस्लिम समाजाचा जनआक्रोश

लातूर : प्रतिनिधी
मुस्लिम समाजाच्या धर्मगुरुंचा अवमान करणे तसेच मुस्लिम समाजाविषयी वारंवार अपमानकारक वक्तव्य, विधाने करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुस्लिमांवर होणा-या धार्मिक हिंसेच्या घटनांच्या निषेधार्थ दि. ८ ऑक्टोबर रोजी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
सध्या देशभरासह महाराष्ट्रातही इस्लाम धर्माबाबत व इस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्याविषयी अतिशय द्वेषपूर्ण व अपमानजनक वक्तव्य जाणिवपूर्वक करुन मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम सुरु आहे. रामगिरी महाराज, भाजपा आमदार नितेश राणे, उत्तर प्रदेशातील नरसिंमानंद सरस्वती महाराज यांनी जाणिपुर्वक अपमानजनक वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
साता-यातील पुसेवाडी, गाजापूर विशाळगडची घटना, नुरुल हसन शिकलगर यांची मॉब लिंचिंगने केलेली हत्या या घटना निषेधार्य आहेत. लातूर शहरात आजपर्यंत जातीय तणाव झालेला नाही. परंतू, काही वर्षांपासून काही संघटना शहरात मुस्लिम धर्माविषयी जाणिवपुर्वक द्वेषपुर्ण वातावरण निर्माण करीत आहेत. या द्वेषातून दि. २९ सप्टेंबर रोजी औसा-लातूर रोडवर मुस्लिम कुटूंबाच्या दुचाकीला कारने धडक देऊन दोघांचा बळी घेतला. दोघे गंभीर जखमी झाले, असे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनाद नमुद केले आहे.
या जनआक्रोश धरणे आंदोलनात युवकांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुस्लिम धर्मगुरु आणि मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे रामगिरी महाराज व भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR