32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeनांदेडसत्तेचा फायदा स्वत:साठी करणा-यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही

सत्तेचा फायदा स्वत:साठी करणा-यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही

 नाना पटोलेंचा अशोक चव्हाण यांना इशारा

नांदेड : सत्तेचा फायदा स्वत:साठी करणा-या अशोक चव्हाण यांनी माझ्याबद्दल बोलू नये. तेवढी त्यांची पात्रता नाही. ज्या काँग्रेसमध्ये ते राहिले त्याच काँग्रेसमधील लोकांना हरवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, असा आरोप नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.

नांदेड लोकसभेच्या प्रचारादरम्यान अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्रिपदासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकले असते, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावरून नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना प्रतिउत्तर दिले आहे.

बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांचाकडे नोटा छापायची मशिन होती. ती बंद पडल्याने त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसबद्दल काहीच बोलू नये. अन्यथा त्यांनी केलेली सर्व कामे बाहेर काढण्याचे औषध माझ्याकडे आहे. त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांची चिठ्ठी वाचून दाखवली होती. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे, असा इशारा नाना पटोलेंनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.
त्यांनी राज्यात काय काय पापं केली याची मोठी यादी माझ्याकडे आहे. ज्या पक्षात राहतात तिथे खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, अशी खरमरीत टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR