कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील – सरूडकर यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, उध्दवसेनेचे उपनेते संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार पाटील यांना उध्दवसेनेकडून हातकणंगलेतून महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली आहे. अनपेक्षितपणे त्यांना उमेदवारी दिल्याने हातकणंगलेत लढत वाढली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता मोजकेच कार्यकर्ते आणि नेत्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे त्यांच्या अर्जाला सूचक आहेत. अर्ज दाखल करताना हातकणंगले मतदारसंघातील तीन मतदार आणि उध्दवसेनेचे पवार उपस्थित होते.