छ. संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर २५ जानेवारीच्या पहाटे एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. चालकाला झोप लागल्यामुळे बाजूच्या कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला होता. या घटनेला ४८ पूर्ण होत नाही तर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यावरून अमरावतीकडे जाणा-या एका कारने चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली आहे. या धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला असून जखमींवर मालेगाव येथे उपचार सुरू आहे. ही घटना वाशिमच्या मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक २३४ कॉरिडॉर येथे घडली.
समृद्धी महामार्गावरील मालेगाव लोकेशन चॅनल क्रमांक २३४ कॉरिडॉरजवळ एक भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णत: चुराडा झाला आहे. शकील पठाण हा २७वर्षीय युवक या अपघातात जागीच ठार झाला असून अनिकेत चंदू जाधव हा २८ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे पुण्याहून अमरावती येथे जात होते.