सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रे मुळे या वॉशिंग मशीन सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर बेरोजगार युगाचा प्रश्न जनतेसमोर आल्याने या सरकारच्या विरोधात वातावरण निर्मित झाल्या असल्याकारणाने सरकारने ईडीच्या माध्यमातून बारामती अॅग्रोला नोटीसद्वारे आमदार रोहित पवार यांना चौकशी करिता बोलावलेले आहे आणि आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवार यांच्या सोबतच भक्कमपणे राहणार आहे .
या ईडी सरकार चा निषेध करण्याकरिता चार हुतात्मा पुतळा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी भारत जाधव शहराध्यक्ष विदयार्थी अध्याक्ष निशांत सावळे प्रमोद गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शिंदे ज्येष्ठ नेते सुनीता रोटे महिला अध्यक्ष, चंद्रकांत पवार जनरल सेक्रेटरी, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, सरफराज शेख युवकशहराध्यक्ष ,प्रतीक्षा चव्हाण ,जावेद शिकलकर , नुरुद्दीन मुल्ला दक्षिण विधानसभा अध्यक्ष ,लक्ष्मण भोसले ,विजय भोईटे ,अक्षय जाधव ,बिराप्पा बंडगर लखन गावडे ,समर्थ लवटे, राहुल भालेराव ,ओम आदलिंगे ,विनायक, आदर्श उडानशिवे , अक्षय जाधव राहुल भालेराव, विभुते , महेश शावळकर, अभी कांबळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.