27.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरसरस्वती संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थी सहायता केंद्राचे उद्घाटन 

सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थी सहायता केंद्राचे उद्घाटन 

लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शहराच्या मध्यवर्ती भागात संपर्क साधता यावा यासाठी मालपाणी संकुल अशोक हॉटेल चौक येथे विद्यार्थी सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्राचे नुकतेच उद्घाटन स्वारातीम विद्यापीठाचे सदस्य प्रा. डॉ. अशोक मोठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यूजीसी नेक कमिटीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर हरिदास फे-हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य तालमणी डॉ. राम बोरगावकर हे उपस्थित होते.  सुरुवातीस प्रभारी प्राचार्य  गोरे यांनी या कक्षाची स्थापना का केली याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पाहुणे व उद्घाटक यांची  यथोचित भाषणे झाली. डॉ. राम बोरगावकर यांनी या केंद्राची माहिती दिली.  सूत्रचंचालन प्रा. डॉ. सुदाम पवार यांनी केले तर आभार प्रा. बालाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. गणेश बोरगावकर, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. राम पाटील, सुनीता बोरगावकर इत्यादी मंडळी उपस्थित होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR