23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रसाडी दिली की मच्छरदाणी?

साडी दिली की मच्छरदाणी?

नवनीत राणांनी दिलेली साडी पाहून आदिवासी महिला संतापल्या

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळीपूर्वीच आदिवासी महिलंना साड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या आहेत. ‘साडी दिली की मच्छरदाणी?’ असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी विचारला आहे. मेळघाटमधील आदिवासी महिलांचा संताप व्यक्त करणारा हा व्हीडीओ देखील सध्या खूप व्हायरल झाला आहे.

दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा होळीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राणा दाम्पत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र या साड्या पाहून तेथील आदिवासी महिला चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांच्या रागाचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करत हे व्हीडीओ आता पुढे आले आहेत.

द्यायचीच होती तर जरा ठीकठाक द्यायची ना, ही अशी साडी कशाला द्यायची? सगळी जाळी आहे ही साडी म्हणजे.. अशी प्रतिक्रिया आदिवासी महिलांनी व्यक्त केली. आमच्या महिलांना ही जी साडी देण्यात आली आहे ती मच्छरदाणीसारखी साडी आहे. लोकांची काय इज्जत राहील यामध्ये?

नवनीत राणा यांना आमची विनंती आहे, मेळघाट क्षेत्रातील जे आदिवासी बांधव आहेत, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील एका इसमाने व्यक्त केली. एकंदरच हे साडीवाटप नवनीत राणा यांना महागात पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR