21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीसातारा जिल्ह्यात बंदीस्त केलेल्या कासापुरीच्या ३४ ऊसतोड मजुरांची सुटका

सातारा जिल्ह्यात बंदीस्त केलेल्या कासापुरीच्या ३४ ऊसतोड मजुरांची सुटका

परभणी/प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ऊसतोड मजूरांना दि.१७ मार्च पासून अंबवडे (ता. कोरेगाव जि.सातारा) येथे ऊसतोडीच्या उचल पैशावरून व अन्य राज्यात ऊसतोडीला नेण्यासाठी ३४ उसतोड मजुरांना बंदिस्त करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या प्रयत्नांमुळे या सर्व ऊसतोड मजुरांची सुटका झाली आहे. हे सर्व ऊसतोड मजूर आपल्या कासापूर गावी सुखरूप परतले आहेत.

दि.२१ मार्च रोजी विष्णु उत्तम वैराळ हे परभणीत येऊन भेटले व सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठांना प्रत्यक्ष भेटून प्रकरणाचे गांभीर्य सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी गावडे यांनी पोलिस अधीक्षक परदेशी व कामगार अधिकारी यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली. तसेच रात्रीच साता-याचे जिल्हाधिकारी यांना कासापुरी (जि.परभणी) येथील ऊसतोड मजूरांची सुटका करण्यात यावी अशी सुचना केली. यानंतर सातारा जिल्हाधिका-यांनी २१ तारखेलाच रात्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय जगदाळे यांच्याशी फोनवरून बोलून कारखान्याचे शेतकी अधिकारी कणसे यांना ऊसतोड मजूरांजवळ पाठवून चर्चा केली. परंतु टोळी मालक शिवाजी साळुंखे यांच्याशी बोंलणे केले परंतु टोळी मालक हा आडमुटीवर आला व त्याने ऊसतोड मुकदमाचे ट्रॅक्टरच स्वत:च्या घरी लावले आणि तो ऊसतोड मजूरांना धमकावत होता. त्यानंतर पप्पूराज शेळके यांनी कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्याशी मोबाईलवरून परभणीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कामगार अधिकारी यांचे पत्र व्हॉटसअपवर पाठविले.

त्यानंतर सातारा जिल्हाधिका-यांनी कारखान्याशी बोलून ऊसतोड मजुरांची सुटका करण्याबाबत चर्चा झाली. परंतु टोळी मालक हा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगितल्यानंतर रात्रीच ११ वाजता एपीआय बर्गे यांना व इतर २ पोलिसांना पाठवून टोळी मालक शिवाजी साळुंखे यांच्या शेतातील आखाड्यात जाऊन ऊसतोड मजूरांना दिलासा दिला. ऊसतोड मजूर सिध्दार्थ वैराळ व इतर २ जणांसह साळुंखे यांना कोरेगाव पोलिस ठाण्याला घेऊन आले. सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी दि.२२ मार्च रोजी पहाटे २.३२ मिनिटांनी मोबाईलवरून बोलणे झाले. त्यानंतर त्यांंनी कोरेगाव पोलीस ठाण्याला फोन करून मजुरांची सुटका करण्याचे व परभणीला रवाना करण्याचे आदेश दिले. जरंडेश्वर कारखान्याचे एमडी विजय जगदाळे यांनी दुपारी कोरेगाव पोलीस ठाण्याला जाऊन ऊसतोड मजूर सिध्दार्थ वैराळे यांची चौकशी केली. दि.२३ मार्च रोजी रात्री १ वाजता परभणीसाठी मजूर रवाना झाले व दि.२४ मार्चला रात्री ११ वाजता कासापुरी (ता.पाथरी) येथे स्सुखरूप पोहचले आहेत.

जिल्हाधिकारी गावडे, पोलिस अधीक्षक परदेशी, जिल्हा कामगार अधिकारी माणगावकर, जिल्हाधिकारी यांचे स्विस सहायक मठपती, बारहाते, एकनाथ आवाड, उसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेश घोडे, गणेश वाघमारे, परमेश्वर अडागळे, सातारा येथील पत्रकार दत्ता सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वाचे मानवी हक्क अभियानच्या वतीने पप्पू शेळके यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR