28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरसायकल फेरीस शहरात चांगला प्रतिसाद

सायकल फेरीस शहरात चांगला प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याप्रती जनजागृती व्हावी, पर्यावरणाचे संतुलन राहावे यसाठी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधन नितीन जसवंत चापसी व कल्ट सायकल क्लब यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.  पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीची सुरुवात करण्यात आली. तसेच ते या फेरीमध्ये प्रत्यक्ष सहभागीही झाले.
या वेळी सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगीरे, पोलीस उपनिरीक्षक बाबू गित्ते, लातूर सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष अमृत मेळकुंदे, उपाध्यक्ष अभिजीत सरसंबेकर, सचिव गणेश हाके, सायकल बडीजचे अध्यक्ष विकास कातपूरे, कोमल शिंदे, भाग्यश्री शिंदे, शिल्पा पाठक, वैशाली इंगोले, सपना मुंडे, विमल डोळे, धनंजय गुट्टे उपस्थित होते.  यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. तसेच प्रत्येकाने इतर चार जणांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR